वितरकांनी दुचाकी खरेदीदारांना शिरस्त्राण न दिल्यास होणार कारवाई !
पिरवहन विभागाचा आदेश
पुणे – दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला २ शिरस्त्राण देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे कार्यवाही करणे आवश्यक असून शिरस्त्राण न दिल्यास संबंधित विक्रेत्याचे ‘ट्रेड सर्टिफिकेट’ (व्यापार प्रमाणपत्र) रहित केले जाईल. वितरकांनी शिरस्त्राण देतांना अधिकचे पैसे आकारू नयेत, असा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आर्.टी.ओ.कडून) काढण्यात आला आहे. अपघातात डोक्यावर शिरस्त्राण नसल्याने जीव गमवावा लागतो. वाढत्या अपघातांमुळे खरेदीदाराला २ शिरस्त्राणे देण्याच्या संदर्भात मोटर वाहन कायद्यामध्ये प्रावधान करण्यात आले आहे. याविषयी न्यायालयानेही आदेश दिलेले आहेत.