इंदापूर पंचायत समितीतील गटविकास अधिकार्यांच्या कार्यालयात स्वामी समर्थांची प्रतिमा !
|
इंदापूर (जिल्हा पुणे) – पंचायत समितीतील गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये स्वामी समर्थांची प्रतिमा (फोटो) लावली. कार्यालयातील महापुरुषांच्या प्रतिमा (फोटो) काढल्या आहेत. त्याविषयी ‘बहुजन समाजवादी पार्टी’चे महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित ठोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन खेद व्यक्त केला आहे. ‘अशा अधिकार्यांची येथून पुढे गय केली जाणार नाही. त्यांनी महापुरुषांचे फोटो तेथे लावले नाहीत, तर आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांचा निषेध करू’, अशी चेतावणी ठोकळे यांनी दिली. (देवता आणि संत यांच्या प्रतिमा लावण्यात गैर काय ? एखाद्याची त्यावर श्रद्धा आहे, तर इतरांचा आक्षेप कशाला ? – संपादक)
ठोकळे म्हणाले, ‘‘देवतांची छायाचित्रे लावा; पण महापुरुषांच्या प्रतिमा काढणे, हे योग्य नाही. (तथाकथित पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांवर खालच्या पातळीवर टीका केली, तेव्हा ठोकळे यांनी निषेध का केला नाही ? – संपादक) डॉ. आंबेडकर यांनी सर्व जातींच्या लोकांना समानतेचा अधिकार दिला. सचिन खुडे हे मातंग समाजाचे असूनसुद्धा त्यांना महापुरुषांप्रती द्वेष निर्माण होत असेल, तर त्यांना त्या आसंदीवर (खुर्चीवर) बसण्याचा अधिकार नाही.’ ज्यांनी आरक्षण दिले, त्यांच्यामुळे ते त्या आसंदीवर बसत आहेत, त्यांच्याच अपमान करत त्यांच्या प्रतिमा बाहेर काढल्या, याचा इंदापूर तालुक्यातील बहुजन समाजवादी पक्षाने निषेध करून आंदोलन करणार आहे.