‘मराठीत बोलणार नाही’, असे म्हणत अरेरावी करणार्या ‘एअरटेल’च्या पदाधिकार्याला मनसेने दिला चोप !
मराठी कर्मचार्यांना वेतन न दिल्यास कार्यालय फोडण्याची चेतावणी
पुणे – ‘मराठीत बोलणार नाही’, असे म्हणत मराठी कर्मचार्यांवर अरेरावी करणार्या ‘एअरटेल’ आस्थापनाच्या ‘टीम लीडर’ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चोप दिला आहे. वाकडेवाडी परिसरातील ‘एअरटेल’च्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. हा ‘टीम लीडर’ मराठी कर्मचार्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. कार्यालयात हिंदीतच बोलायचे, मराठी बोलल्यास कामावरून काढून टाकणे, सणावारांना सुटी नाकारणे, २-२ महिने वेतन न देणे असे प्रकार ही व्यक्ती करत होती. त्यामुळे येथील कर्मचार्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. त्याची माहिती मिळताच शाहबाज अहमद नामक व्यक्तीने पुन्हा त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शाहबाज अहमदकडे या प्रकरणी जाब विचारला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी त्याला चोप दिला.
‘येत्या सोमवारपर्यंत मराठी कर्मचार्यांचे वेतन दिले नाही, तर एकाच वेळी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील आस्थापनांची कार्यालये फोडली जातील’, अशी चेतावणी त्यांनी या वेळी संबंधितांना दिली.
संपादकीय भूमिकामराठीबहुल महाराष्ट्रात वारंवार होणारी मराठीची गळचेपी म्हणजे मराठी भाषा मृत होत असल्याचेच लक्षण ! |