दिवा येथे साहाय्यक आयुक्तांवर धर्मांध टपरीचालकांचे आक्रमण !
ठाणे, ४ जानेवारी (वार्ता.) – दिवा येथील कल्याण फाटा परिसरातील अटलांटा इमारतीसमोर पदपथावरील अनधिकृत टपरीवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पोलीस आणि साहाय्यक आयुक्त घुगे गेले होते. (पदपथावर अनधिकृत टपर्या उभारल्याच कशा जातात ? प्रशासनाचे यावर नियंत्रण नाही का ? – संपादक) त्या वेळी टपरीचालकांनी त्यांच्या समवेत वाद घातला. त्यानंतर साहाय्यक आयुक्त घुगे कारवाईसाठी पुढे गेले असता टपरीचालकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. अब्दुल्ला शाहआलम आणि शहाआलम शहाजान खान अशी आक्रमणकर्त्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशा उद्दाम धर्मांधांना कारागृहातच डांबायला हवे ! |