खरे आणि खोटे साधू अन् संत यांविषयी जनजागृती करणारी सनातनची ग्रंथमालिका !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि सद्गुरू डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे
साधू-संतांचे महत्त्व आणि कार्य
सांप्रतकाळी राष्ट्र-धर्म यांची स्थिती बिकट असल्याने ती सुधारण्यासाठी प्रयत्नशील काही संतांची उदाहरणे, त्यांचे धर्महिताचे मार्गदर्शन, तसेच खर्या साधू-संतांची प्रतिमा मलीन करणारी प्रसारमाध्यमे आणि त्यांना साथ देणारे शासनकर्ते, पोलीस अन् बुद्धीवादी यांचे खरे स्वरूपही या ग्रंथात दिले आहे.
भोंदू बाबांपासून सावधान !
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ।’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत. त्याऐवजी लोकेषणा आणि वित्तेषणा यांच्या आहारी गेलेले, आपल्या अयोग्य वर्तणुकीने साधू-संतांच्या प्रतिमेला बट्टा लावणारे तथाकथित साधू-संत अन् स्वामीजी यांच्याविषयीचे अनुभव कथन करणारा हा ग्रंथ आहे.
सनातनचे ग्रंथ ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७