पुणे येथे हत्येचा प्रयत्न करणार्या दोघांना अटक !
२ पिस्तुले आणि ७ काडतुसे जप्त
पुणे – शरद मोहोळ यांच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न करणारे संदेश कडू आणि शरद मालपोटे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुलांसह ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या ‘विभाग २’ या पथकाने केली आहे. आरोपींच्या विरोधात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ५ जानेवारी २०२४ या दिवशी शरद मोहोळ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मोहोळ टोळीचे अस्तित्व दाखवणे, हा त्यांचा हेतू होता. आरोपींनी मध्यप्रदेशातून पिस्तुले आणि काडतुसे खरेदी केली होती.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित पुणे शहर ! |