पुणे येथे अल्पवयीन मुलावर अत्याचार करणार्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी !
खेड (जिल्हा पुणे) – येथील विशेष न्यायालयाने व्यायाम शाळेत अल्पवयीन मुलावर अत्याचार करणार्या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी खेड येथील विशेष न्यायालयातील न्यायाधीश एस्.पी. पोळ यांनी आरोपीला ही शिक्षा सुनावली. १ जानेवारी २०२२ या दिवशी सायंकाळी पीडित अल्पवयीन मुलावर व्यायामशाळेत लैंगिक अत्याचार झाले. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली. पोलीस उपनिरीक्षक वाय.वाय. पाटील यांनी या प्रकरणी अन्वेषण केले.
संपादकीय भूमिकान्याय मिळवण्यासाठी २ वर्षे वाट पहावी लागल्यामुळे पीडित मुलाला झालेला मनस्ताप कसा भरून येणार ? न्याय लवकर मिळण्यासाठी यामध्ये कोणती सुधारणा करू शकतो, हे न्यायपालिका पाहील का ? |