वाकड (पिंपरी) येथे पानाच्या दुकानामध्ये गांजा विक्री करणार्यास अटक !
पिंपरी (पुणे) – येथे पान दुकानामध्ये (टपरी) गांजा विक्री करणार्या पुनीत कुमार या पानटपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पुनीत कुमारकडून ५ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष्य ठेवले होते. पुनीत हा त्याच्या ‘साई श्री पान शॉप’ या दुकानातून गांजा विक्री करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून पुनीत कुमारला अटक करण्यात आली.