सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी शोधून काढलेले ‘प्राणशक्तीवहन पद्धतीचे अद्भुत उपाय’, ही आपत्काळातील संजीवनी !
२२.६.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्यासाठी सनातन आश्रम (रामनाथी) गोवा येथे प्राणशक्तीवहन पद्धतीने नामजपादी उपाय केले. त्या वेळी सनातनचे ७३ वे (समष्टी) संत पू. प्रदीप खेमका यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प.पू. डॉक्टरांनी प्राणशक्तीवहन पद्धतीने नामजपादी उपाय करण्याचे सांगितलेले महत्त्व
१ अ. स्थूल देहातील शक्तीप्रवाहात निर्माण झालेले अडथळे न्यास आणि जप यांद्वारे दूर होत असणे : ‘माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंत शक्तीची केंद्रे असतात. स्थूल देहात ठिकठिकाणी शक्तीप्रवाहात अडथळे निर्माण होत असतात. त्यासाठी अडथळा असलेल्या ठिकाणापासून १ इंच अंतरावर न्यास करून नामजप, अक्षरजप आणि अंकजप केल्यानंतर तो अडथळा दूर होतो. त्यानंतर त्या अवयवात शक्ती प्रवाहित होऊन हालचाल चालू होते.
१ आ. प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आता केवळ षड्चक्रांवरच उपाय करून चालणार नाहीत, तर व्यक्तीच्या शरिरातील सर्व स्थानांवर (डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कुठेही) असलेला शक्तीच्या प्रवाहातील अडथळा शोधून त्यावर उपाय करावे लागतील.
१ इ. ‘आपत्काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध होणार नसल्याने संतांनी धर्माचे कार्य करणार्या लोकांसाठी हे उपाय करून त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे : ‘‘आपत्काळात आधुनिक वैद्य (डॉक्टर) उपलब्ध होणार नाहीत आणि औषधेही उपलब्ध नसतील. त्यामुळे संतांनी हे उपाय शिकून सात्त्विक लोकांसाठीच उपाय करायचे आहेत आणि त्यांचे रक्षण करायचे आहे. जे लोक धर्मासाठी काहीच करत नाहीत, त्यांच्यासाठी उपाय करण्यात वेळ घालवू नये. आपत्काळात आपण प्राणशक्तीवहन पद्धतीच्या उपायांमुळेच लोकांचे रक्षण करू शकणार आहोत.’’
१ ई. प.पू. डॉक्टर पुढे म्हणाले, ‘‘जी व्यक्ती समष्टीसाठी सात्त्विक असेल, तिच्यासाठी हे उपाय करून आपल्याला तिचे रक्षण करावे लागणार आहे.’’
२. अंक हे अक्षरापेक्षा अधिक सूक्ष्म आणि सात्त्विक असणे
सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘अंक आणि अक्षरे यांमध्ये कोणता जप अधिक सूक्ष्म आहे ?’’ तेव्हा गुरुदेवांनी सांगितले, ‘‘अंक हे अक्षरापेक्षा अधिक सूक्ष्म आणि सात्त्विक आहेत.’’
३. प.पू. गुरुदेवांनी ‘य’ हे अक्षर म्हणून पू. दातेआजींच्या पायाजवळ न्यास केल्यानंतर पू. आजींच्या पायाची थोडी हालचाल झाली.
४. पू. दातेआजींच्या मृत्यूयोगाविषयी प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना सांगितलेले सूत्र
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘आपण पू. दातेआजी यांचा मृत्यूयोग टाळला’, असे मला वाटते.’’ त्यावर प.पू. गुरुदेवांनी त्यांना सांगितले, ‘‘मी असा विचार केला नव्हता. केवळ अभ्यासासाठी प्रयोग म्हणून मी तसे केले.’’ (त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘मला काय वाटते, हे सांगण्यापेक्षा मी या प्रक्रियेविषयी जिज्ञासूपणाने प्रश्न विचारणे, अपेक्षित होते.’ – (सद्गुरु) डॉ. पिंगळे)
प.पू. गुरुदेवांचे अद्भुत ज्ञान आणि शिकवण पाहून मला त्यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञता वाटली. मी माझे महान गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शतशः नमन करतो.
कृतज्ञता ! कृतज्ञता आणि कृतज्ञताच !!!’
– प्रार्थनारत आणि सदैव आपलाच,
(पू.) प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे (समष्टी) संत, वय ६४ वर्षे), धनबाद, बिहार. (१३.७.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |