अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन करावयाचा नामजप तो त्रास न्यून झाल्याने आता करावयाची आवश्यकता नाही !
साधकांना सूचना
‘सनातनच्या राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात अडथळे आणण्यासाठी वाईट शक्ती साधना अन् समष्टी सेवा करणार्या साधकांना अनेक प्रकारे त्रास देत आहेत. या त्रासांमधील एक प्रकार म्हणजे गेल्या काही मासांपासून (महिन्यांपासून) साधकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. हे लक्षात घेऊन साधकांचे अपघातांपासून रक्षण होण्यासाठी ४ ऑगस्ट २०२४ पासून साधकांना वैयक्तिक नामजपासह १ घंटा ‘महाशून्य’ हा नामजप ओठांसमोर १ – २ सें.मी. अंतरावर उजव्या हाताचा तळवा धरून करायला सांगितला होता. गेले ५ मास (महिने) साधक हा नामजप करत आहेत आणि त्यांना ‘या नामजपामुळे आपण अपघातातून वाचलो आहोत किंवा अपघात झाला; पण अगदी अल्प प्रमाणात आपल्याला दुखापत झाली’, अशा प्रकारच्या अनुभूती आल्या.
सध्या ६ जानेवारी २०२५ पर्यंत हा नामजप करायचा होता. या नामजपाच्या परिणामाचा आढावा घेतल्यावर ‘आता साधकांवरील अपघातांचे संकट न्यून झाले आहे’, असे आढळून आले. त्यामुळे साधकांनी यापुढे हा नामजप करण्याची आवश्यकता नाही.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.१.२०२५)