Hindu Youth Beaten To Death : रेल्वेत ४ मुसलमान गुंडांनी केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू !
भाग्यनगर (तेलंगाणा) – ‘हैदराबाद-देहली एक्सप्रेस’मध्ये शशांक रामसिंह राज नावाच्या हिंदु तरुणाला महंमद फैयाज, सय्यद समीर, महंमद शाम आणि महंमद अमान या गुंडांनी अमानुष मारहाण केली. या वेळी त्यांनी हत्यार्यांनी शशांकच्या खिशातून पैसे काढून घेतले आणि त्याचा भ्रमणभाष हिसकावून घेतला. प्रचंड मारहाणीमुळे शशांकला रक्ताच्या उलट्या होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शशांक हा उत्तरप्रदेशाच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील राजापूर कैम्हारा येथील रहिवासी होता.
१. याविषयीच्या एका वृत्तानुसार ही घटना २ जानेवारी २०२४ या दिवशी तेलंगाणाजवळ घडली. शशांक हा त्याच्या मित्रांसमवेत रेल्वेतून प्रवास करत होता. या वेळी ४ मुसलमान दरोडेखोरांनी शशांकच्या खिशातून १ सहस्र ७०० रुपये चोरले आणि त्याचा भ्रमणभाष हिसकावून घेतला. शशांकने त्या दरोडेखोरांचा सामना केला आणि त्याचे पैसे परत करण्याची मागणी केली. त्यामुळे दरोडेखोरांनी त्याला अमानुष मारहाण केली. त्यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यासह इतर प्रवाशांनाही मारहाण केली. या वेळी शशांकला गंभीर दुखापत होऊन रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
२. रेल्वे पोलिसांनी चारही आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. रेल्वे प्रशासनाने शशांकच्या कुटुंबियांना दीड लाख रुपयांची हानीभरपाई घोषित केली आहे. (कितीही पैसे दिले, तरी जन्मदात्या आई-वडिलांच्या तरुण मुलाचा जीव परत येऊ शकेल का ? रेल्वेत सुरक्षित प्रवास करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे, हे त्याने सांगितले पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतातील अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे सर्वधर्मसमभाववाले, साम्यवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना अल्पसंख्यांकांची ही झुंडशाही दिसत नाही का ? |