Maulana Shahabuddin Razvi : महाकुंभामध्ये मुसलमानांचे धर्मांतर होणार असल्याचा कांगावा करून हिंदूंची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !
‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांचा थयथयाट !
लखनौ – प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ दिव्य आणि भव्य करण्यासाठी उत्तरप्रदेशाचे योगी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी महाकुंभ मेळ्यात मुसलमानांचे धर्मांतराचे कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याविषयी मौलाना शहाबुद्दीन यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. मौलाना यांनी पत्रात म्हटले आहे की, महाकुंभमेळ्याच्या वेळी मुसलमानांचे धर्मांतर झाले, तर देश आणि राज्य या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. (भारतात तणाव कोण निर्माण करतात, हे सर्वांना ठाऊक आहे ! – संपादक)
मुझे सूत्रों से पता चला है कि महाकुंभ मेला प्रयागराज में कई सौ मुसलमानो का धर्मांतरण कराया जायेगा ?
धर्मांतरण कार्यक्रम कराये जाने पर प्रतिबंध लगाएं!@myogiadityanath @narendramodi @RahulGandhi @priyankagandhi @BJP4India @BJP4UP @rajnathsingh @AmitShah @DM_PRAYAGRAJ pic.twitter.com/zBA3nEp8m5— Maulana Shahabuddin Razvi Bareilvi (@Shahabuddinbrly) January 3, 2025
मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी म्हणाले,
१. मला सूत्रांकडून समजले आहे की, प्रयागराज महाकुंभमेळ्यात शेकडो मुसलमान धर्मांतरित होणार आहेत. तुमच्या (मुख्यमंत्री योगी) नेतृत्वाखालील राज्य सरकारने धर्मांतराच्या विरोधात कायदा केला आहे. आता अशा परिस्थितीत कुंभमेळ्यात मुसलमानांचे धर्मांतर झाले, तर ते धर्मांतर कायद्याच्या कक्षेत येईल. त्यामुळे धर्मांतराच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी.
An attempt to discredit Hindus has surfaced with claims that Muslims will be converted during the Mahakumbh. The allegation was made by Maulana Shahabuddin Razvi Bareilvi, the National President of the All India Mu$!im Jamaat.
Bareilvi’s comments have been met with strong… pic.twitter.com/rBW8jkVtG1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 4, 2025
२. कुंभमेळा हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. इथून जो संदेश जातो, तो समाजाला जोडणारा असावा, तोडणारा नसावा. (हिंदूंचे सण हे समाज जोडण्यासाठीच असतात ! त्यामुळे त्याविषयी अन्य धर्मियांनी हिंदूंनी शहाणपणा शिकवू नये ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|