जिहादी व्यापार्यांना मंदिरातील उत्सवांत निर्बंध घालावेत !
हिंदू रक्षा समितीच्या वतीने फोंडा येथील विविध मंदिरांना निवेदन सादर
फोंडा, ३ जानेवारी (वार्ता.) – देवस्थानचे वार्षिक जत्रोत्सव किंवा अन्य उत्सव यांवेळी मंदिर परिसरात भरणार्या फेरीमध्ये जिहादी आणि अहिंदू व्यापारी यांना व्यावसायिक दुकाने थाटण्यास अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदू रक्षा समितीने केली आहे. हिंदू रक्षा समितीचे पदाधिकारी श्री. सुनील देसाई, विश्व हिंदु परिषदेचे विभागमंत्री श्री. मोहन आमशेकर आदींच्या शिष्टमंडळाने फोंडा तालुक्यातील प्रमुख मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांना यासंबंधीचे एक निवेदन नुकतेच सुपुर्द केले आहे. रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थान, मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान, म्हार्दाेळ येथील श्री महालसा देवस्थान, कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थान आणि शिरोडा येथील श्री कामाक्षी देवस्थान या प्रमुख मंदिराच्या व्यवस्थापनाला हे निवेदन देण्यात आले आहे. या मंदिरांमध्ये आता जत्रोत्सव होणार आहे. या उपक्रमाला सर्व मंदिरांच्या व्यवस्थापनाने उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती मोहन आमशेकर यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना श्री. मोहन आमशेकर म्हणाले, ‘‘आज ‘थूंक जिहाद’ आदी गलीच्छ प्रकार उघडकीस येत आहेत. असे जिहादी किंवा अहिंदु फेरीवाले विक्रेते यांच्यामुळे देवस्थान परिसराचे पावित्र्य, स्वच्छता आणि शुचिता भंग पावते. गुटखा आणि तंबाखू खाऊन मंदिराच्या आवारात थुंकण्याचे प्रकार घडतात. जिहादी आणि अहिंदु यांच्यामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असतो. यामुळे देवस्थान परिसरात अहिंदु व्यापार्यांवर निर्बंध आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडे करण्यात आले आहे.’’
बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवा
श्री. मोहन आमशेकर पुढे म्हणाले, ‘‘रस्त्यावर आणि बाजारात विविध व्यवसाय करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावे, अशी मागणी हिंदू रक्षा समितीने विविध पंचायती, पालिका आणि सरकार यांच्याकडे केली आहे. यामुळेच स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय मिळणार आहे.’’