मुंबईतील शासकीय कर्मचार्यांचे वेतन मुंबई बँकेतून होणार !
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २ जानेवारी या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत शासकीय कर्मचार्यांचे वेतन मुंबई बँकेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचार्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास, तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.