नियमित नामजप केल्याने कोल्हापूर येथील श्रीमती शकुंतला बापू पाटील (वय ७५ वर्षे) यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना आनंद मिळणे
१. नामजप चालू करण्यापूर्वी सासूबाईंना होणारे त्रास
अ. ‘गेली ५० वर्षे सासूबाईंना धाप लागणे आणि सर्दी यांचा त्रास होत होता.
आ. त्यांना पाण्यात हात घातला की, त्रास व्हायचा. त्यांना थंडी सहन होत नव्हती.
इ. त्यांना गुडघेदुखी, रक्तदाब आणि मधुमेह यांचा त्रास होता.
ई. त्या मासातून १५ दिवस आजारी असायच्या.
२. एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करणे
त्या प्रतिदिन नियमित नामजप आणि प्रार्थना करतात. त्या नामजप करतांना एका ठिकाणी बसून एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करतात. त्या गावी गेल्या, तरी त्या ठरलेल्या वेळी नामजपाला बसून नामजप पूर्ण करतात.
३. नामजप चालू केल्यानंतर सासूबाईंमध्ये झालेले पालट
अ. आता सासूबाईंचे आजारपण उणावले आहे. धाप आणि सर्दी यांवरील सर्व गोळ्या बंद झाल्या आहेत.
आ. आता त्यांना मधुमेहाची गोळी एक दिवसा आड घ्यावी लागते.
इ. त्यांना पूर्वी दिवसातून दोन वेळा रक्तदाबाच्या त्रासासाठीच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या. आता एकच गोळी घ्यावी लागते.
ई. मध्यंतरी त्यांना ‘न्यूमोनिया’ झाला होता; पण त्यांना त्याचा काहीच त्रास जाणवत नव्हता.
उ. त्या घरी येणार्या प्रत्येकाचे नमस्कार करून आदरातिथ्य करतात.
ऊ. त्या नेहमी आनंदी असतात.’
– सौ. गौरी सतीश पाटील (श्रीमती शकुंतला बापू पाटील यांची सून), कोल्हापूर (९.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |