वाळूमाफियांची ३ लाख रुपयांची वाळू उपसा बोट नष्ट !
पुणे – येथील सरडेवाडी गावाच्या हद्दीत लोंढेवस्ती लगतच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जानेवारी या दिवशी वाळू उपसा करणारी ३ लाख रुपयांची फायबर बोट नष्ट करण्यात आली. बोटीत असणारी १६ सहस्र रुपयांची २ ब्रास वाळू तहसीलदार आणि महसूल विभागाच्या पथकाने नदीत बुडवली आहे. या प्रकरणी पिल्या उपाख्य सौरभ वाघमारे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंडल अधिकारी शाम झोडगे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.