मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक !
गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात कामांचे लोकार्पण केल्याचे श्रेय
मुंबई – राज्य सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवर केलेली ‘पोस्ट शेअर’ करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. १ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात विविध कामांचे लोकार्पण केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू-भगिनींचे विशेष अभिनंदन !’’