धर्मांध अझहरकडून अल्पवयीन मुलीला गुंगीचे शीतपेय देत अत्याचार !
धर्मांध अटकेत !
दापोली (रत्नागिरी) – येथील अझहर याने समाजमाध्यमाद्वारे स्वतःची हिंदु नावाने ओळख करून देऊन अल्पवयीन मुलीला एका फार्महाऊसमध्ये नेत शीतपेयामधून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लील छायाचित्र काढून ते सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्या समवेत वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला सातत्याने मारण्याची धमकी दिली. यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
१. जेव्हा मुलीला मुसलमानाचे खरे नाव समजले, तेव्हा त्याने तिच्यामागे लग्न करण्यासाठी तगादा लावला; पण तिने नकार दिल्याने मुलीला त्याने त्रास दिला.
२. तिने पोलिसांत तक्रार केल्यावर त्याला अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
संपादकीय भूमिका :कावेबाज धर्मांधांपासून हिंदु तरुणींनी सावध व्हावे ! |