प्रवासात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या धर्मांधाला जन्मठेप !
नवसारी (गुजरात) येथील न्यायालयाचा निर्णय !
वर्ष २०२१ मधील प्रकरणाचा निकाल !
मुंबई – अल्पवयीन मुलीच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवत तिला प्रवासातून निर्जनस्थळी पळवून नेऊन ५ घंट्यांत ३ वेळा बलात्कार केल्याप्रकरणी महंमद सादिक खत्रीचा (वय ३५ वर्षे) याला नवसारी येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. १६ वर्षांच्या मुलीवर त्याने अत्याचार केले. वर्ष २०२१ मधील या प्रकरणाचा निकाल वर्ष २०२५ मध्ये लागला. (अशाने धर्मांधांना कायद्याचा वचक कसा बसेल ? – संपादक)
निकाल देतांना नवसारी ‘विशेष पोक्सो’ न्यायालयाने नोंदवले की, समाजात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे वाढत असतांना, न्यायालयाने शिक्षा ऐकवतांना संयम बाळगू नये. अल्पवयीन पीडितेच्या वेदना समजून घेण्यासाठी उच्च पातळीची संवेदनशीलता आवश्यक आहे. या प्रकरणात पालक, पोलीस, अधिवक्ता आणि न्यायालय यांच्यासमोर अनेक वेळा पीडितेची परीक्षा घेतली जाते, हेे तिच्यासाठी पुष्कळ त्रासदायक असू शकते. पकडलेल्या धर्मांधाची असाहाय्य आणि विकृत मानसिकता दिसते. त्यामुळे जन्मठेपेचा निर्णय घेण्यात आला. पीडित मुलीची शेअरचॅटवरून भिवंडीतील धर्मांधाशी ओळख झाली होती.
मध्यरात्री १ वाजता आरोपीने तिला वसईतून मुंबईला जाणार्या रेल्वेत सोडले. त्यानंतर तिने तिच्या मामाला बोलावून पोलिसांत तक्रार दिली होती.