पोषण आहारासाठी दिल्या जाणार्या अनुदानाचे लेखापरीक्षण होणार !
पुणे – ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते. या अनुदानातून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारही दिला जातो. ही योजना योग्य पद्धतीने चालू आहे का ? याची पहाणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने वर्ष २०२१ ते २०२४ या काळातील शाळांच्या पोषण आहाराचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या निर्देशाअन्वये शहर, तालुका आणि जिल्हा स्तरांवर केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी ‘शिंदे, चव्हाण, गांधी आणि कंपनी’ या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती केली आहे. योजनेस पात्र असणार्या सर्व शाळांचे लेखापरीक्षण ही संस्था करेल. पात्र शाळांनी उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक आणि वस्तूनिष्ठ माहिती भरावी. लेखापरीक्षणास माहिती सादर न करणार्या शाळा प्रमुखांवर दंडात्मक, तसेच प्रशासकीय कारवाई होईल. शाळांचे लेखापरीक्षण होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याचे दायित्व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे असेल, असे स्पष्ट केले आहे.
संपादकीय भूमिका
|