जाबीर अली याने ‘सूरज’ नाव सांगून हिंदु महिलेशी केला विवाह !
|
डेहराडून (उत्तराखंड) – उधम सिंह नगरमधील किच्छा येथे स्वत:ला ‘सूरज’ म्हणवून घेणार्या जाबीर अली नावाच्या मुसलमानाने एका हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने त्याने तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. या वेळी जबीर याने पीडित महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि अपकीर्ती करण्याची धमकी देत तिच्याशी बलपूर्वक लग्न केले. जाबीर याने महिलेचे दागिने आणि पैसे हडप केले आणि तिला ६ वर्षांनी सोडून दिले.
पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘जाबीर याने मला लग्न करण्यास भाग पाडेले. मी जाबीर अली याला हिंदु मानत होती; मात्र सत्य समोर आल्यानंतर पुष्कळ उशीर झाला होता. जाबीर मला मारहाण करायचा आणि धर्मांतरासाठी दबाव टाकायचा. जबीर आणि त्याचे कुटुंबीय यांनी मला जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. लग्नानंतर काही काळानंतर माझे दागिने आणि पैसे हडप करण्यात आले आणि माझ्याावर हुंडा आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर मला माझ्या ६ वर्षांच्या मुलीसह घराबाहेर काढण्यात आले.’ या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी दिली, तरच लव्ह जिहाद्यांवर वचक बसेल ! |