Take Action Against Tista Setalvad : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करणार्या तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेवर कारवाई करा !
अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर; चौकशीचे आश्वासन !
अहिल्यानगर – मंदिरांच्या समस्या सोडवण्याच्या आणि त्यांचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्याच्या उदात्त उद्देशाने २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी शिर्डीत तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध तिस्ता सेटलवाड आणि फादर सेर्डिक यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ संघटनेने खोट्या तक्रारी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी लिखित तक्रार मंदिर महासंघाच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर, महासंघाचे ‘कोअर टीम’चे सदस्य, तसेच बुर्हानगर जगदंबा भवानी मंदिराचे प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत आणि ‘स्वामी समर्थ केंद्रा’चे प्रतिनिधी श्री. अजिंक्य गायकवाड यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली.
@HinduJagrutiOrg@SG_HJS
खोट्या बातम्या पसरवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांची तथाकथित सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस यांच्या विरोधात अहिल्यानगर येथील SP श्री राकेश ओला यांच्याकडे तक्रार दाखल!https://t.co/j8Ib21QjPA— pratiksha korgaonkar (@bharatranragini) January 3, 2025
या प्रसंगी अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी अहिल्यानगर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, ‘सब जेल चौक’चे श्री. गणेश पलंगे उपस्थित होते. अशीच तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यातही प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
🚨 Memorandum submitted to Superintendent Police Ahilyanagar, urging action against Teesta Setalvad’s organization, Citizens for Justice and Peace (CJP), for filing false complaints against the Maharashtra Mandir Nyas Parishad. 📜
SP assures investigation. ⚖️
@bharatranragini… pic.twitter.com/u8W1xvaSAA— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2025
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक – |
प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद केले आहे की, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ,’ विरार येथील श्री जीवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने शिर्डीत शांततेत अन् यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पडला. इतकेच नव्हे, तर वर्ष २०२३ मध्ये जळगाव आणि ओझर (पुणे) येथेही अशा परिषदांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व आयोजनांमधून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, तसेच धार्मिक सलोखा बिघडलेला नाही. तरीसुद्धा ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य आणि भाषणस्वातंत्र्य या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’चा भारत आणि हिंदु द्वेष्टा इतिहास !या संस्थेवर पूर्वीही ‘भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खोटे आरोप करणे’, ‘बेस्ट बेकरी प्रकरणात साक्षीदारांना पैसे देऊन खोट्या साक्षी देण्यास भाग पाडणे’, ‘न्यायालयात खोटे पुरावे देऊन न्यायालयाची दिशाभूल करणे’, ‘संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करणे’, ‘विदेशातील ‘फंडिंग’मध्ये घोटाळे करणे’ इत्यादी गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे या संस्थेच्या मंदिर परिषदेच्या विरुद्ध खोटी तक्रार करण्यामागे हिंदुविरोधी कट आहे का ? त्यासाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय ‘फंडिंग’ घेतले आहे का ? तसेच तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न होत आहे का ? या सर्व गोष्टींची चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करणे, असे प्रकार या संस्थेने केले आहेत. सदर तक्रारीची प्रत राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच शिर्डी पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आली आहे. |