Muzaffarnagar Hindu Temple : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात सापडले बंद मंदिर !
|
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानमबहुल परिसरात २ वर्षांपासून बंद असलेले एक मंदिर सापडले आहे. हे मंदिर पुन्हा हिंदूसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात येत आहे. मंदिर अनुमाने ४० वर्षे जुने असून तेथे श्री कालीमाता, तसेच श्री दुर्गादेवी यांच्या मूर्ती आहेत. संकुलात हवनकुंडही आहे.
१. शहरातील खतौली भागात असलेल्या इस्लामनगर परिसरातील पॉवर हाऊसच्या मागे हे मंदिर आहे. खासगी भूमीवर बांधलेले हे मंदिर मलिक कुटुंबाने अनुमाने ४० वर्षांपूर्वी बांधले होते.
२. मंदिराची माहिती समोर येताच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोर्चा काढण्यास आरंभ केला. त्यामुळे पोलीस तेथे मोठ्या संख्येने पोचले.
३. पोलिसांनी भूमीच्या मालकाला बोलावले असून मंदिरात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. भूमीच्या मालकाने सांगितले की, मूर्ती २ वर्षांपूर्वी भंगली होती. यानंतर मूर्तीची स्थापना दुसर्या मंदिरात केली गेली.
४. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देशात मुसलमानबहुल परिसरात एकापाठोपाठ एक बंद पडलेल्या हिंदु मंदिरांची माहिती समोर येत आहे. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद ! |