भिवंडीत बेकायदेशीर वास्तव्य करणारे ७ बांगलादेशी कह्यात !
भिवंडी – तालुक्यातील मानकोली येथील एका गोदामात बेकायदेशीर वास्तव्य करणार्या ७ बांगलादेशी घुसखोरांवर नारपोली पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना कह्यात घेतले आहे. आतापर्यंत भिवंडीत ३० बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. इमोन अरसद खान, महंमद फजरअली जोसेफउद्दीन, इआनुल इकलाज मंडल, डॉली शाहीद अन्सारी, राणी कासिम शेख, लीमा हमीन खान, शिवली अब्दुलरज्जाक कलाम अशी कह्यात घेतलेल्या बांगलादेशींची नावे आहेत.
या सर्वांवर परकीय नागरिक कायदा कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील काही जण ‘जोडारी’चे (‘प्लंबिंग’चे) काम करत होते, तर काही जण मजूर म्हणून काम करत होतेे. (डिसेंबर २०२४ मध्ये राज्यात २० हून अधिक बांगलादेशी घुसखोर आढळले होते आणि आता जानेवारी महिना चालू होऊन १ दिवसही होत नाही, तोच ७ जण आढळले आहेत. बांगलादेशी घुसखोरांसाठी महाराष्ट्र नंदनवन बनले असून सरकारने यांच्या संदर्भात कठोर कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक)