निवती येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणारी परप्रांतीय नौका मत्स्य विभागाच्या पथकाने पकडली
सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची महिन्यातील चौथी कारवा
मालवण – महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसखोरी करून वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणारी मलपी, कर्नाटक येथील अतीजलद यांत्रिक मासेमारी नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या पथकाने ३१ डिसेंबरला पकडली. पुढील कार्यवाहीसाठी ही नौका सर्जेकोट, मालवण येथील बंदरात आणण्यात आली आहे. एका महिन्यात परराज्यातील नौकांवर केलेली ही चौथी कारवाई आहे. नौकेची तपासणी, नौकेतील मासळीचा लिलाव करणे आणि अन्य कार्यवाही मत्स्य विभागाकडून चालू आहे.
परराज्यातील नौकांची महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रात होणारी घुसखोरी, मासळीची होणारी लूट, स्थानिक मासेमारांची होणारी हानी थांबली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे नुकत्याच नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात केली होती. त्यामुळे परप्रांतीय मासेमारी नौकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईविषयी मासेमारांतून समाधान व्यक्त केले जात आहे.