घाटीवडे येथे रस्त्यावर हत्ती आल्याने वाहतुकीवर परिणाम
दोडामार्ग – २ आठवड्यांपूर्वी चंदगड तालुक्यातून दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोर्यातील हेवाळे-बांबर्डे गावात येऊन हत्तीने शेती आणि बागायती यांची हानी केली. त्यानंतर हा हत्ती मोर्ले, केर गावात आला आणि ३० डिसेंबरला रात्री घाटीवडे, बांबर्डे येथे आला. ३१ डिसेंबरला सकाळी हा हत्ती पुन्हा घाटीवडे येथे मुख्य रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक रोखली गेली. थोड्या वेळानंतर हा हत्ती जंगलात गेला. या भागात हत्तीचा वावर वाढल्याने आणि मुख्य रस्त्यावर तो येऊ लागल्याने वन विभागाने येथे बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
संपादकीय भूमिकाहत्तींमुळे जनतेला वारंवार त्रास सहन करावा लागत असतांनाही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना न निघणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |