समृद्धी महामार्गावर अचानक ५० वाहने पंक्चर !
मुंबई – समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव ते वनोजा पथकरनाका या मार्गात रात्री ५० वाहने पंक्चर झाली होती. महामार्गावर पडलेल्या लोखंडी फलकावरून वाहने गेल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. ही घटना चुकून घडली आहे कि कुणी मुद्दामहून हा प्रकार केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक प्रवाशांना त्यांच्या वाहनाचे पंक्चर काढता न आल्याने ते रात्रभर समृद्धी महामार्गावर अडकले होते. यामुळे पुष्कळ प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.