तळेगाव (पुणे) एम्.आय.डी.सी.मधून ३ बांगलादेशींना अटक !
पिंपरी (जिल्हा पुणे) – तळेगाव एम्.आय.डी.सी. परिसरातून हुसेन शेख, मोनिरुल गाझी, अमीरूल साना या ३ बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ३० डिसेंबर या दिवशी नवलाख उंब्रे येथे करण्यात आली. त्यांनी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत भारतीय असल्याचे भासवले. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणार्या एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार रोशन पगारे यांनी तळेगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर !
शहरात सातत्याने बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे पोलिसांच्या कारवायांवरून दिसून येते. औद्योगिक पट्ट्यात बांगलादेशी नागरिक स्थायिक झाले आहेत. गेल्या २ वर्षांत आयुक्तालयाच्या अंतर्गत ३७ बांगलादेशी आणि मूळचे म्यानमारचे असणार्या २ रोहिंग्या कुटुंबांतील चौघांवर कारवाई केली. शहराच्या पत्यावर पारपत्र काढलेल्या ६२ बांगलादेशींचे पारपत्र रहित करण्यात आले आहे. बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (पुण्यासह उपनगरातील काही दलालांकडूनही पैशांसाठी बांगलादेशींना थेट कागदपत्रांची उपलब्धता करून दिल्याचे दिसून आले आहे. कोणताही परवाना न घेता, विनापारपत्र, व्हिसा घेऊन भारतात प्रवेश करत बांगलादेशींनी अन्वेषण यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या, आतंकवाद्यांच्या कारवाया यांमुळे सामान्य नागरिकांसाठी पुणे असुरक्षित बनले आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाप्रामुख्याने एम्.आय.डी.सी. परिसरासह उपनगरांमध्ये छुप्या पद्धतीने बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत अन्वेषण यंत्रणांसह सुरक्षा विभागाला आव्हान निर्माण करत आहेत. बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने कायद्याची कठोर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. |