रुग्णांची स्वच्छता कर्मचार्याकडून पडताळणी !
|
मुंबई – मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील ‘पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालया’त पडताळण्यासाठी आलेल्या रुग्णांची पडताळणी स्वच्छता कर्मचारी करत असल्याचे आढळून आले. तो रुग्णांचे ECG (हृदयाच्या स्पंदनांचा काढला जाणारा आलेख) करत आहेत. समाजवादी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्दिकी यांनी हा प्रकार उघडकीस आणला.
वरील प्रकाराविषयी विचारणा केली असता रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले म्हणाले, ‘‘आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांची संख्या अल्प असल्याने स्वच्छता कर्मचार्यांना याचे प्रशिक्षण दिले आहे.’’ या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी रुक्साना सिद्दिकी यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशा स्थितीत एखाद्या रुग्णाच्या जिवावर बेतल्यास त्याला उत्तरदायी कोण ? |