पुणे येथे हवेची गुणवत्ता मोजणार्या यंत्रणांची महापालिकेकडे अपूर्ण माहिती !
माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सजग नागरिक मंचाची मागणी !
पुणे – महापालिका, स्मार्ट सिटीकडून शहराच्या हद्दीत ४५ ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणार्या यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. यंत्रणेने मोजणी केलेली जूनपर्यंतचीच माहिती महापालिकेकडे उपलब्ध असून उर्वरित माहिती गायब आहे. प्रशासनाने ही यंत्रणा कुठे बसवली ? त्याच्या दैनंदिन नोंदी कोण घेते ? ही यंत्रणा खरोखरच चालू आहे का ? असे प्रश्न ‘सजग नागरिक मंचा’चे श्री. विवेक वेलणकर यांनी उपस्थित केले असून यंत्रणेने मोजणी केलेली आकडेवारी प्रतिदिन महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहराच्या प्रदूषणाची स्थिती नागरिकांना समजल्यास नागरिक प्रदूषण नियंत्रणासाठी हातभार लावतील, या उद्देशाने वर्ष २०१५ नंतर पुणे ‘स्मार्ट सिटी’ने शहरात ४५ ठिकाणी हवा गुणवत्ता पडताळणारी यंत्रणा बसवली होती. आता स्मार्ट सिटीकडील सर्वच यंत्रणा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या यंत्रणेचे कामकाज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अखत्यारित आले आहे. या पार्श्वभूमीवर हवेच्या गुणवत्तेची दैनंदिन माहिती मिळण्यासाठी सजग नागरिक मंचाचे श्री. विवेक वेलणकर यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे माहिती मागितली असता महापालिकेकडे अपुरी माहिती असल्याचे लक्षात आले.
संपादकीय भूमिका
|