वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी झालेल्या जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे
१. ‘हिंदु राष्ट्र कसे असणार ?’, याचे उत्तर मिळणे
‘सध्या ‘भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हावा’, अशी मागणी जोर धरू लागली आहे. माझ्या मनात ‘हे हिंदु राष्ट्र कसे असणार ?’, अशी शंका असे. मला वाटत असे, ‘या हिंदु राष्ट्राची तुलना साक्षात् रामराज्याशी केली जाते; पण त्याचे स्वरूप कसे असेल ?’ त्याचे उत्तर मला गोव्यात जून २०२४ मध्ये झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर मिळाले.
२. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर त्रेतायुगात असल्याचा साक्षात्कार होणे
मी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर ‘मी त्रेतायुगात आहे’, अशी जाणीव (साक्षात्कार) होऊन मला रामराज्याची अनुभूती आली.
‘रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधक नम्रपणे, १०० टक्के प्रामाणिक, उत्साही आणि आनंदी जीवन जगत आहेत’, हे पाहून मला साक्षात् रामराज्यात आल्याची अनुभूती आली.
३. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणार आहे’, अशी मनाची निश्चिती होणे
‘रामराज्यासमान हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या कृपेमुळे आता काही वर्षांतच होणार आहे’, याची प्रचीती मला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधकांमधील भक्तीभाव पाहून आली. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणार आहे’, अशी माझ्या मनाची निश्चिती झाली.’
– श्री. शिवाजी लक्ष्मण शिनगारे, तळंदगे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. (जुलै २०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |