भाजपचे आमदार महेश लांडगे यांना ‘श्री शिवशंभो धर्मयोद्धा पुरस्कार २०२४’ !
पलूस (जिल्हा सांगली) – शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पलूस तालुक्याच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ‘श्री शिवशंभो धर्मयोद्धा पुरस्कार २०२४’ हा भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांना प्रदान करण्यात आला. आपल्या मनोगतामध्ये श्री. महेश लांडगे यांनी सर्व धारकर्यांना धर्माभिमान आणि स्वाभिमान जपण्याचा संदेश दिला.
भाजपचे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी गोहत्या, गो तस्करी, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ यांसारख्या भीषण सामाजिक समस्येवर सर्वांचे लक्ष वेधले. याप्रसंगी श्री. रावसाहेब देसाई आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पलूसचे अध्यक्ष श्री. रोहित पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले. शिवस्फूर्ती चेतवण्यासाठी शिवा काशिद यांच्या बलीदानाचा जिवंत देखावा साकारला होता. या वेळी ज्येष्ठ धारकरी श्री. सुनील लाड, सर्वश्री सर्जेराव नलवडे, सूर्यकांत कटारे, सागर सुतार, तसेच सर्व धारकरी आणि महिला वर्ग उपस्थित होता.