मी प्रामाणिकणे दिलगिरी व्यक्त करतो ! – सुरेश धस, आमदार, भाजप
प्राजक्ता माळी यांच्याविषयी विधानाचे प्रकरण !
बीड – अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात मी जे वक्तव्य केले त्यात भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी माझ्या वक्तव्यात त्यांना ‘ताई’ म्हटले होते. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मला कुणाचाही अवमान करायचा नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाचे मन दुखावले असेल, तर मी प्रामाणिकणे दिलगिरी व्यक्त करतो, असे मत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.