Alternative To ‘Porn’ Putin : ‘पॉर्न’ला पर्याय म्हणून अधिक मनोरंजक आणि आकर्षक सामग्री सिद्ध करा ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन
मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगभरात ‘पॉर्नोग्राफी’ (पॉर्न म्हणजे अश्लील छायाचित्रे किंवा व्हिडिओ ) सामग्रीच्या लोकप्रियतेवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, जर आपल्याला यापासून मुक्ती हवी असेल, तर आपल्याला अधिक आकर्षक आणि मनोरंजक सामग्री सिद्ध करावी लागेल. जर आपण असा चांगला पर्याय उपलब्ध करून दिला, तरच ‘पॉर्न कॉन्टेंट’च्या समस्येपासून आपण मुक्त होऊ शकू.
१. पुतिन म्हणाले की, अशा सामग्रीवर बंदी घालणे, हा एक पर्याय असू शकतो; मात्र आपण या लोकांना पर्याय म्हणून अधिक मनोरंजक आणि आकर्षक सामग्री सिद्ध करून देणे, हेही प्रभावी ठरेल.
२. पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, लोकांनी कार्यालयामध्ये दुपारच्या जेवणाच्या सुटीत अथवा न्याहारीच्या वेळी शारीरिक संबंध ठेवायला हवे. यामुळे देशाचा जन्मदर वाढण्यास साहाय्य होईल. रशिया गेल्या अनेक वर्षांपासून घटत्या जन्मदराचा सामना करत आहे.
३. गेल्या वर्षी ते म्हणाले होते की, लोकांनी किमान ८ मुलांना जन्म द्यायला हवा आणि मोठ्या कुटुंबाची संकल्पना पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करायला हवी.
संपादकीय भूमिकापुतिन यांनी असे पर्याय सुचवण्यापेक्षा लोकांना अध्यात्माची कास धरण्याचे आवाहन केले असते, तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते ! |