माणसाच्या प्रगतीचे साधन !
झालेल्या चुका आपण होऊन लक्षात येणे; निदान कुणी सांगितल्या, तर मोकळ्या मनाने मान्य करणे आणि न संतापता ‘पुनरपि’ त्या वा तशा चुका हातून घडणार नाहीत, याची दक्षता घेणे, हेच माणसाच्या प्रगतीचे साधन आहे; पण हृदयात घर करून बसलेला अहंकार इतका बलवान असतो की, तो सत्याचे खरे ज्ञान होऊच देत नाही. हे लक्षात घ्यावे म्हणून समर्थ रामदासस्वामी ‘सत्य तें सत्य वाचे वदावे आणि मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे’, असे आग्रहाने सांगत आहेत.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)