संपादकीय : इस्लाम म्हणजे ‘शांती’ ?
‘इस्लाम’ पंथाचा जन्म १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी अरब देशात झाला. ‘इस्लाम’ हा शब्द अरबी आहे. अरबी भाषेत याचा अर्थ ‘शरणागती’ असा होतो. ‘इस्लाम’ शब्द अरबी भाषेतील ‘सा-ला-मा’पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘शांती’ आहे. सध्याची जगाची स्थिती पाहिल्यास ‘किती इस्लामी देशांमध्ये शांती आहे ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. मध्य-पूर्व आशियातील बहुतेक इस्लामी देशांत, उदा. सिरिया, इराण, इराक, येमेन, जॉर्डन, इजिप्त, लेबनॉन या देशांमध्ये गेल्या काही दशकांपासून अशांतता आहे. त्यांच्याच शेजारील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांची स्थिती वेगळी म्हणून सांगायलाच नको. भारतातही जेथे मुसलमानबहुल लोकसंख्या आहे, त्या काश्मीरची स्थिती गेल्या ३५ वर्षांपासून कशी आहे ?, हे प्रत्येक भारतियाला ठाऊक आहे. बांगलादेशामध्ये सध्या काय चालू आहे, ते जग पहात आहे. अन्य इस्लामी देशांमध्ये न्यून-अधिक प्रमाणात अशांततेची स्थिती आहे. त्यामुळे ‘ज्या पंथाच्या नावाचा अर्थ ‘शांती’ आहे, त्या पंथियांच्या देशांमध्ये अशी अशांतता आणि अस्थिरता का आहे ?’ याची जागतिक स्तरावर चर्चा होण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी या पंथाचा सखोल अभ्यास करणे आणि त्यांच्या अनुयायींची मानसिकता पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी कोण पुढाकार घेणार ?, हेही पहावे लागेल. ‘धर्मनिरपेक्ष’ भारत आणि त्यातील ‘गांधीवादी हिंदू’ कधीही असा पुढाकार घेण्याची शक्यता नाही. ख्रिस्ती देशांमध्ये म्हणजे अमेरिका आणि युरोपमधील देश हे असा पुढाकार तेव्हाच घेतील, जेव्हा त्यांना त्यात त्यांचा काही स्वार्थ दिसेल, अन्यथा ते याकडे ढुंकूनही पहाणार नाहीत.
हा विषय मांडण्याची आवश्यकता म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील तालिबान सरकार यांच्यात युद्ध चालू झाले आहे. या दोन्ही देशांत ‘ड्युरंड’ रेषेवरून वाद चालू आहे. त्यातून त्यांच्यात आता युद्ध चालू झाले आहे. तालिबानने पाकच्या पेशावर शहरावर दावा केला आहे. तेथे त्याचे आतंकवादी पाक सैन्याला लक्ष्य करत आहेत. पाकिस्तानने तालिबानला अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहाय्य केले असतांना आज दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. यावरून दोघांची मानसिकता लक्षात येते. दोघेही कट्टर इस्लामी देश आहेत. दोघेही शांती सांगणार्या इस्लामचे अनुयायी आहेत आणि तेच एकमेकांशी लढत आहेत. पाकिस्तान अण्वस्त्रधारी असतांना अफगाणिस्तानने पाकला आव्हान दिले आहे आणि पाक सैन्याच्या काही चौक्यांवर नियंत्रणही मिळवले आहे, हे विशेष ! यातून पाकच्या सैन्यामध्ये किती दम आहे, हे लक्षात येते. ‘अशा पाकला भारतात आतंकवादी कारवाया करूनही भारताने अद्याप समूळ नष्ट का केले नाही ?’, हा प्रश्न उपस्थित होतो. जे तालिबान करत आहे, ते भारताला का शक्य झाले नाही ? किंवा भारत असे का करत नाही ? भारताच्या आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांची गांधीवादी मानसिकता यामागे होती, हेच लक्षात येते.
अशांतता निर्माण करणार्यांवर व्यापक चर्चा आवश्यक !
दोन इस्लामी देश एकमेकांशी लढण्याचे हे एकमेव उदाहरण नाही, तर इराण-इराक, पाकिस्तान-बांगलादेश हीसुद्धा उदाहरणे आहेत. त्या जोडीला या इस्लामी देशांमध्ये आतंकवादी आणि बंडखोर संघटना यांच्याकडूनही हिंसाचार केला जात आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत शिया आणि सुन्नी या २ संप्रदायांमध्येही हिंसाचार चालू आहे. पाकमध्ये बलुची मुसलमानांवर पाकचे पंजाबी मुसलमान शासनकर्ते आणि सैन्य अत्याचार करत आहेत. ‘अहमदिया’ मुसलमानांना ‘मुसलमान’ मानण्यासच नकार देण्यात आला आहे. त्यांच्यावरही अत्याचार केला जात आहे. त्यांच्या मशिदी पाडल्या जात आहेत. ‘जर या पृथ्वीतलावरून इस्लामला वगळले, तर पृथ्वीवरील शांततेत खर्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वाढ होईल’, असे कुणाला वाटल्यास ते चुकीचे ठरू नये. एखादा पंथ किंवा धर्म मानवतेसाठी पूरक असला पाहिजे. त्या धर्माद्वारे, पंथाद्वारे मनुष्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होऊन त्याचे जीवन सुखी, समाधानी अन् आनंदी झाले पाहिजे; मात्र सध्याच्या इस्लामी देशांकडे पाहिल्यास असे कुठेच दिसून येत नाही. ते अन्य पंथीय आणि धर्मीय यांच्याशी लढतांना स्वतःही एकमेकांशी लढतात. भारतात तेच हिंदूंवर मशिदी पाडल्याचा आणि मशिदींमध्ये स्फोट घडवल्याचा आरोप करतात अन् दुसरीकडे स्वतःच मशिदी पाडतात किंवा त्यांमध्ये मोठमोठे स्फोट घडवून आणतात. यामागे काय कारण आहे, यावर चर्चा हाेणे आवश्यक झाले आहे. ‘इस्लामच्या धर्मग्रंथांनुसार आम्ही आचरण करतो’, असे मुसलमान म्हणत असतात. ‘इस्लामनुसार मूर्तीपूजा चुकीची आहे. ती इस्लामला मान्य नाही’, असे सांगत इस्लामच्या स्थापनेनंतर अन्य पंथियांना आणि धर्मियांना ठार करून किंवा त्यांना बाटवून इस्लामचा जगभर प्रसार झाला, हा इतिहास आहे, तो नाकारता येणार नाही. ‘ज्याचा इतिहासच असा आहे, तो शांती कशी निर्माण करणार ? जो पंथ अन्य लोकांना मानतच नाही, तो त्यांच्याशी बंधूभावाने आणि शांततेत कसा रहाणार ?’, असे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांवर जगात चर्चा झाली पाहिजे आणि त्यावर काय उपाय काढू शकतो, याचेही चिंतन करणे आवश्यक आहे. भारतात एका पूर्वाश्रमीच्या मुसलमानाने (आता त्याने हिंदु धर्म स्वीकारला आहे) न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करून कुराणातून २६ आयते (प्रेषिताची वाक्ये) काढून टाकण्याची मागणी केली होती. या आयतांमुळे हिंसाचाराला प्रोत्साहन मिळते, असा दावा त्यांनी केला होता. ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे कुणीतरी असा विचार करत आहे, हेही पहावे लागेल. दुसरीकडे जगात अनेक मुसलमान त्यांच्या पंथाचा त्याग करत आहेत. ‘एक्स मुस्लिम’ अशा प्रकारची चळवळ जगात चालू झाली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतातही ही चळवळ चालू असल्याचे समजते. एकीकडे जगात चर्च ओस पडू लागली आहेत. त्यांना विकण्यात येत आहे. काही देशांत हिंदूंनी असे चर्च विकत घेऊन तेथे मंदिर बांधले आहे. तसाच प्रकार इस्लामविषयी लोकांमध्ये निर्माण होऊ लागल्याचेही दिसत आहे. ही स्थिती उत्तरोत्तर वाढली, तर आश्चर्य वाटू नये. ही स्थिती का आली आहे ? यावरही चिंतन होणे आवश्यक आहे. इस्लामी विचारवंतांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ते असा विचार करतील, अशी अपेक्षा करण्याचा प्रयत्न केला जात आहे; कारण भारतात तरी असे विचारवंत दिसत नाहीत की, ते स्पष्टपणे इस्लामी अनुयायींच्या चुकीच्या गोष्टींवर किंवा इस्लाममधील काही गोष्टींवर चर्चा करत आहेत. भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना याविषयी मते मांडत असतात. नेदरलँड्स येथील गीर्ट विल्डर्स यांच्यासारखे राजकीय नेतेही भूमिका मांडत असतात. आता याविषयी व्यापक चर्चा चालू झाली पाहिजे !
जगात शांतता निर्माण करण्यासाठी अशांतता पसरवणार्यांवर वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा होणे आवश्यक ! |