Isro’s ‘Spedex’ Mission : ७ जानेवारीला अंतराळात २ यान एकमेकांना जोडले जाणार !
|
श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून ३० डिसेंबरच्या रात्री भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (‘इस्रो’ने) ‘स्पेडेक्स’ म्हणजेच ‘अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम’ प्रक्षेपित केली. यात ‘सी.एस्.एल्.व्ही.-सी ६०’ रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून ४७० कि.मी. वर अंतराळात २ यान जोडले जाणार आहेत.
🚀👏 ISRO Makes History! 🎉
ISRO successfully launched the #SpaDeXMission, a groundbreaking campaign that demonstrates “in-space docking”. 🛰️
This cost-effective mission involves two small spacecraft, launched from #Sriharikota, which will dock in space. 🤝
If successful,… pic.twitter.com/R0XeK0VtaV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 31, 2024
७ जानेवारी २०२५ या दिवशी हे २ यान जोडले जातील.
मोहीम यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. या मोहिमेच्या यशावर भारताची ‘चंद्रयान-४’ मोहीम अवलंबून आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. ही मोहीम वर्ष २०२८ मध्ये प्रारंभ होऊ शकते.