Rail Jihad In PUNE : पुणे येथे रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न !
अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद !
पुणे – उरुळी कांचन येथील रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शताब्दी रेल्वेचे लोको पायलट आर्. टी. वाणी यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. उरुळी कांचनच्या हद्दीत रेल्वे विद्युत् पोल किलोमीटर क्रमांक २१९/७-५ च्या जवळ पुण्याकडे जाणार्या रेल्वे रुळावर ही घटना ३० डिसेंबरच्या रात्री पावणेअकरा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस शरद वाळके यांनी तक्रार दिली आहे. भरलेला सिलिंडर रेल्वे रुळावर कुणी आणि कुठल्या उद्देशाने ठेवला ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.
🚨 Rail J!h@d in Pune! ⚠️
💥 Shocking Attempt at Sabotage: A gas cylinder was deliberately placed on railway tracks in Pune, endangering countless lives!
👮Authorities have registered a case against unidentified individuals.
🛤️ Let’s stand united against these malicious… pic.twitter.com/y9mwK412fo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 1, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्.टी. वाणी यांना पुण्याच्या दिशेने जात असतांना, दुसर्या ट्रॅकवर उरळी कांचनकडून पुण्याला जाणार्या मार्गावर प्रिया गोल्ड आस्थापनाच्या गॅसचा सिलिंडर आढळला. या सिलिंडरमध्ये ३ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गॅस होता. त्यानंतर त्यांनी तो सिलिंडर रेल्वे रुळापासून दूर नेत अज्ञात व्यक्तीचा घातपात घडवण्याचा कट उधळून लावला. शरद वाळके यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आणि वरिष्ठ यांना दिली.