Bangladesh May Release Indian Fishermen : बांगलादेश ९५ भारतीय मासेमारांची सुटका करणार !
ढाका (बांगलादेश) – अडीच महिन्यांपूर्वी बांगलादेश तटरक्षक दलाने बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील काकद्वीप येथून बांगलादेशाच्या हद्दीत शिरलेल्या ९५ भारतीय मासेमारांना अटक केली होती. आता भारताच्या चेतावणीनंतर बांगलादेशातील महंमद युनूस सरकारने कारागृहातील या सर्व मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारने मासेमारांकडून जप्त केलेल्या ६ नौकाही परत करण्याचा निर्णय घेतला आहे.