Azerbaijan Plane Crash : विमान अपघातासाठी उत्तरदायी असलेल्यांना शिक्षा करू ! – रशिया
रशियाचे अझरबेजानला आश्वासन
बाकू (अझरबेजान) – अझरबेजान एअरलाइन्सचे विमान २५ डिसेंबर या दिवशी कोसळले होते. यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला होता. अझरबेजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी या अपघातासाठी रशियाला उत्तरदायी धरले होते. आता रशियाने अझरबेजानला आश्वासन दिले आहे की, विमान अपघाताला उत्तरदायी असणार्यांना नक्कीच शिक्षा होईल.
१. रशियाने विमान अपघाताविषयी अझरबेजानची क्षमा मागितली होती; परंतु त्यांचे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र अपघाताचे कारण असल्याचे मान्य केले नाही.
२. अझरबेजान विमान अपघाताविषयी राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी रशियाकडे तीन मागण्या केल्या आहेत. प्रथम, रशियाने अझरबेजानची क्षमा मागितली पाहिजे. दुसरे म्हणजे, रशियाने त्याची चूक मान्य करावी आणि तिसरे, दोषींना शिक्षा देण्यासमवेतच रशियाने अझरबेजान सरकार, मृतांचे कुटुंबीय अन् घायाळ प्रवासी यांना हानीभरपाई द्यावी.