Moradabad Gauri Shankar Mandir Reopened : मुसलमानबहुल भागात ४४ वर्षे बंद असणार्या शिवमंदिराचा प्रशासन करत आहे जीर्णोद्धार !
वर्ष १९८० च्या दंगलीनंतर मंदिर करण्यात आले होते बंद !
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमानबहुल भागात सापडलेल्या गौरीशंकर मंदिराचा जीर्णोद्धार प्रशासनाकडून चालू करण्यात आला आहे. हे मंदिर जवळपास ४४ वर्षे बंद होते. या मंदिरात भगवान शिवाची मूर्ती आहे. येथे वर्ष १९८० मध्ये झालेल्या दंगलीनंतर हे मंदिर बंद करण्यात आले होते. या दंगलीत मंदिराच्या पुजार्याला धर्मांध मुसलमानांनी ठार मारून जाळले होते. या दंगलीत ८३ लोकांचा मृत्यू झाला होता.
🙏🏻 Moradabad Gauri Shankar Temple in a Minority-dominated area, Reopens after 44 years. 🕉️
The temple was closed following the 1980 riots when the archaka was tragically murdered. 🚫
The administration began renovating the temple, and during the excavation, they found… pic.twitter.com/ig8mQLLgV1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 31, 2024
१. या पुजारीचे नातू सेवाराम यांनी या मंदिराबद्दल जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, हे मंदिर त्यांचे पणजोबा भीमसेन यांनी बांधले होते आणि त्यानंतर त्यांचे स्वतःचे कुटुंब त्यात पूजा करायचे. वर्ष १९८० च्या दंगलीनंतर मंदिर बंद करण्यात आले होते आणि प्रवेशद्वारावर भिंत बांधण्यात आली होती. आता लोक येथे जात नाहीत.
२. हे मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी त्यांनी स्थानिकांसमवेत निदर्शनेही केली होती. यानंतर मुरादाबाद महानगरपालिका आणि प्रशासन यांचे पथक मंदिराच्या ठिकाणी पोचले. त्यांनी मंदिरासमोर बांधलेली भिंत पाडली आणि मंदिरामध्ये टाकण्यात आलेली माती बाहेर काढली. त्यानंतर येथे श्री हनुमानाची मूर्ती, तसेच शिवलिंग आढळून आले. प्रशासन आता मंदिराचा जीर्णोद्धार करत आहे. येथे लवकरच काम चालू होणार आहे.
३. या संदर्भातील अन्वेषणाचा अहवाल योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या वर्षी सार्वजनिक केला होता. यापूर्वी दंगलीचा अहवाल गुप्त ठेवण्यात आला होता कारण त्यामुळे खर्या गुन्हेगारांची ओळख पटू शकली असती. मुस्लिम लीगचे नेते शमीम अहमद आणि हमीद हुसेन अन् त्यांच्या समर्थकांनी ही दंगल केली होती. त्यांना उत्तरप्रदेशात मुस्लिम लीगचे पुनरुज्जीवन करायचे होते. त्या काळात काँग्रेस हाफिज महंमद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती.
४. या हिंसाचारासाठी मुस्लिम लीगला जमियत उलेमा-ए-हिंद आणि तबलीग-ए-इस्लाम यांसारख्या इस्लामी संघटनांकडून निधी मिळाला होता. दंगलीपूर्वीच्या ३ महिन्यांत अनेक हिंसक घटना घडल्या होत्या. वाढत्या तणावाचा लाभ घेत मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्या नेत्यांनी १३ ऑगस्ट १९८० या ईदच्या दिवशी एका अफवेद्वारे दंगल घडवली.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे कुठे आणि कुणामुळे बंद झाली होती, हे लक्षात घेता भारतात मुसलमान नाही, तर हिंदूच असुरक्षित आहेत, हे लक्षात येते ! अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी हिंदूंनी संघटित आणि सतर्क रहाण्यासह हिंदुत्वनिष्ठ सरकारांनी मुसलमानांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे ! |