श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस आजपासून प्रारंभ होणार !
तुळजापूर – श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून प्रारंभ होणार असल्याने मंदिर संस्थानने सायंकाळच्या विधींच्या वेळांमध्ये पालट केला आहे. ७ जानेवारीला घटस्थापनेनंतर श्री तुळजाभवानीदेवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ होणार आहे. ३१ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत हा नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. ३१ डिसेंबरला सायंकाळी देवीचा अभिषेक सायंकाळी ७ ऐवजी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत अभिषेक पूजा थांबवण्यात येईल. त्यानंतर मेण काढणे आणि अन्य धार्मिक विधी सायंकाळी ७.३० पर्यंत पूर्ण होतील. सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत देवीच्या मंचकी निदेचा विधी पार पडेल. याविषयी तहसीलदारांनी सांगितले आहे.