११ महिन्यांत सायबर फसवणुकीत मुंबईकरांनी गमावले १ सहस्र १८१ कोटी रुपये !
मुंबई – सायबर गुन्ह्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत असून जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांत ‘सायबर हेल्पलाईन’वर तक्रार प्रविष्ट करण्यासाठी ५ लाख संपर्क आले आहेत. या काळात मुंबईत सायबर फसवणुकीच्या ५५ सहस्र ७०७ तक्रारींची नोंद झाली. त्यात १ सहस्र १८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे १३९ कोटी १५ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर फसवणुकीतील पैसे वाचवण्यासाठी पोलिसांनी १९३० क्रमांकाची हेल्पलाईन चालू केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर फसवणुकीची रक्कम परत मिळवण्याचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले असले, तरी फसवणूक झालेली एकूण रक्कम पहाता त्याचे प्रमाण न्यून आहे.राजस्थान, देहली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश या राज्यांमधून सायबर फसवणूक करणार्या टोळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच्याशी संबंधित साडेसहा सहस्र अवैध सीमकार्ड पोलिसांनी बंद केले आहेत. नागरिकांनी न घाबरता तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास पैसे परत मिळू शकतात.
संपादकीय भूमिका
|