एस्.टी. प्रवासात अश्लील व्हिडिओ दाखवल्यामुळे गुन्हा नोंद !

सोलापूर – एस्.टी. बस बारामती ते इंदापूरमार्गे बार्शीकडे निघाली होती. या बसमध्ये एका अनोळखी युवकाने आई-वडिलांच्या समवेत प्रवास करणार्‍या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ (पॉर्न) दाखवले. या अनोळखी युवकाने मुलीसमवेत अश्लील चाळेही केले. मुलीने आई-वडिलांना याविषयी सांगितल्यावर मुलीच्या वडिलांनी संबंधित मुलाला पकडून त्याचा भ्रमणभाष जप्त केला. एस्.टी. बसचालकाने बस थेट पोलीस ठाण्यातच नेल्यावर संबंधित युवकाला पकडून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. (पोलिसांचा धाक संपणे आणि धर्मशिक्षणाच्या अभावी नीतीमत्ता खालावल्यामुळे मुलींवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. पोलीस त्यांचा खाक्या केव्हा दाखवणार ? – संपादक)