मालेगाव येथे १ सहस्र ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना जन्मदाखला दिला ! – किरीट सोमय्या
‘व्होट जिहाद’चा आरोप
मालेगाव – मालेगाव हे रोहिंग्याचे आश्रयस्थान बनत आहे. मालेगाव येथे १ सहस्र ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना जन्मदाखला देण्यात आला आहे. मालेगाव येथून ‘व्होट जिहाद’ चालू असून याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा भाजपचे किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
सोमय्या पुढे म्हणाले की, मालेगावात जे भारतीय नाहीत, त्यांना जन्मदाखला देण्यात आला असून मालेगाव महापालिकेकडून हे झाले आहे. संबंधित सर्व लोकांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रही दिले आहे. या लोकांची चौकशी करावी. या लोकांचा जन्मदाखला रहित करून संबंधित अधिकार्यांचे निलंबन करावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. या दाखल्यांवर एकच पत्ता आहे. मालेगाव तहसीलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांनी स्वत:ची चूक मान्य करून अनवधानाने हे दाखले देण्यात आल्याचे सांगितले आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. (एवढ्या संख्येत दाखले अनवधानाने कसे देण्यात आले ? यामध्ये नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअसे बनावट दाखले देणारे अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! |