मुंबईतील मदरशात रहाणार्या १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या !
मुंबई – मालाड पश्चिमेतील मालवणी येथील मदरशात १० वर्षीय मुलाने रात्री आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. घातपाताची शक्यता नसून मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. धार्मिक शिक्षणासाठी मुलगा मदरशामध्ये रहात होता. सुट्टीच्या दिवशी कुटुंबियांसोबत घरी रहायला यायचा.
रात्री इतर मुले खेळण्यासाठी बाहेर गेल्यावर त्याने गळफास लावून घेतला. त्यानंतर त्याला आधुनिक वैद्यांनी मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहे.
संपादकीय भूमिकामदरशातील घटनेच्या विरोधात निधर्मी प्रसारमाध्यमे कधी आवाज उठवत नाहीत किंवा हिंदूंवर आगपाखड करणार्या वृत्तवाहिन्या चर्चासत्रांचे आयोजन करणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |