Bengal Fake Passport Racket : बंगालमध्ये बांगलादेशींना भारतीय पारपत्र मिळवून परदेशी पाठवणार्या टोळीला अटक
मनोज गुप्ता मुख्य सूत्रधार
कोलकाता (बंगाल) – बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवून देणार्या एका टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स’द्वारे ही टोळी कार्यरत होती. त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत १०० बांगलादेशींना भारतीय पारपत्र देऊन त्यांना परदेशात पाठवले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार मनोज गुप्ता असून त्याला अटक करण्यात आली आहे.
गुप्ता याला त्याच्या टोळीतील समरेश आणि अन्य साथीदार साहाय्य करत होते. गुप्ता याला बंगाल पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी कोलकाता पोलिसांनी दीपांकर दास नावाच्या व्यक्तीला दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून अटक केली होती. ही टोळी बांगलादेशींकडून ५ ते १० सहस्र रुपये घ्यायची आणि त्यांना आधारकार्ड अन् पॅनकार्ड बनवून द्यायची. त्यानंतर त्यांचे नाव मतदार सूचीत समाविष्ट करायची. त्यानंतर खोट्या पत्त्याआधारे त्यांच्या पारपत्रासाठी अर्ज करायची. जेव्हा हे पारपत्र पोस्टाने यायचे, तेव्हा टपाल कार्यालयातील माणसांशी हातमिळवणी करून ते ताब्यात घ्यायची. या सर्व प्रक्रियेसाठी ही टोळी बांगलादेशी नागरिकांकडून ५ लाख रुपये घेत होती.
संपादकीय भूमिकासरकारने या सर्व देशद्रोह्यांना भर चौकात फाशीची शिक्षा केली, तरच इतरांवर वचक बसेल ! |