Bangladeshi Hindus Meets Shankaracharya : भारतातील मुसलमानांना बांगलादेशात पाठवा आणि तेथील हिंदूंना भारतात आणा !
बांगलादेशी हिंदूंची मागणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) – बांगलादेशातून येथे आलेल्या १२ बांगलादेशी हिंदूंनी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या केल्या. ते म्हणाले की, भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशात हिंदूंसाठी स्वतंत्र भूमी देण्यात यावी. यासह भारत आणि बांगलादेश यांमध्ये लोकसंख्येची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे.
Bangladeshi Hindus Meet Swami Avimukteshwarananda Saraswathi (@jyotirmathah): Demand deporting Indian Mu$l|ms to Bangladesh and bringing Bangladeshi Hindus to India!
The possibility of India showing such boldness is minimal!
It is shameful for India that the multi-party rulers… pic.twitter.com/GuKFIxBcm6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 30, 2024
बांगलादेशातून जेवढे हिंदू भारतात येत आहेत, तेवढेच मुसलमान तेथे पाठवले पाहिजेत. जगाच्या पाठीवर कुठेही जन्मलेल्या हिंदूला इस्रायलप्रमाणे भारताचे नैसर्गिक नागरिक मानले पाहिजे. तसेच ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सत्तापालट होण्यापूर्वी भारतात आलेल्या बांगलादेशी हिंदूंच्या व्हिसाची (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का) मुदत वाढवण्यात यावी आणि त्यांना बलपूर्वक बांगलादेशात पाठवू नये. त्यांना भारतात रोजगार उपलब्ध करून द्यावा.
बांगलादेशाला ‘इस्लामी राष्ट्र’ घोषित करण्याचा प्रयत्न
बांगलादेशी हिंदू म्हणाले की, बांगलादेशात आता एकच धोरण आहे आणि ते म्हणजे बांगलादेशाला इस्लामी राष्ट्र घोषित करणे होय. बांगलादेशात जिथे हिंदू दिसतील तिथे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. मंदिरे कह्यात घेतली जात आहेत. तेथील मुसलमान घरात घुसून हिंदु महिलांना मारहाण करून त्यांच्यावर बलात्कार करत आहेत.
संपादकीय भूमिकाअसे धाडस भारत दाखवण्याची शक्यता अल्प आहे. भारतातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांनी गेल्या २५ वर्षांत हाकलू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते भारतासाठी लज्जास्पदच होत ! |