पुणे येथे शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार !
पुणे – शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकेने १० वीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. एका शिक्षकाने शाळेतील बंद असलेली वर्गखोली उघडून पाहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.
सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहिल्यास ते दोघेजण वर्गात जात असतांना निदर्शनास आले. शाळेतील मुख्याध्यापिकेने त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी शारीरिक संबंध ठेवले असल्याचे मान्य केले, तसेच २ दिवसांपूर्वी विद्यार्थ्याने शिक्षिकेला भ्रमणभाष करून त्याचे प्रेम असल्याचे सांगितल्याचेही समोर येत आहे.
संपादकीय भूमिकाअशा इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील मुलांवर काय संस्कार होणार ? समाजातील नीतीमत्ता किती खालच्या स्तराला गेली आहे याचे हे उदाहरण ! |