भाजपच्या खासदार प्रा. (डॉ.) सौ. मेधा कुलकर्णी यांनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग !
पुणे येथे एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुले चढवल्याचा प्रकार !
पुणे – येथील सदाशिव पेठेतील ‘ज्ञानप्रबोधिनी’ शाळेजवळील एका गल्लीमध्ये हिरव्या रंगाने रंगवलेली भिंत आणि त्यावर ठेवलेली हार, फुले, चादर आणि उदबत्ती हे दृश्य सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या घटनेची शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी भेट दिली. त्यांनी स्थानिक नेते संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि दातेरे यांच्यासोबत हिरव्या रंगावर भगवा रंग चढवला. यानंतर सामाजिक माध्यमावर या घटनेचे छायाचित्र आणि चलचित्र प्रसारित झाले.
या घटनेवरून मेधा कुलकर्णी यांनी म्हटले की, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. स्थानिक स्तरावर हिरव्या रंगाचा वापर करून अशा ठिकाणी पूजा करण्यात येते आणि त्यानंतर त्यांचा विस्तार केला जातो. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ? याकडे सजगपणे लक्ष देणे आवश्यक आहे. असे प्रकार लहान स्वरूपात चालू होतात; पण नंतर त्याचा विस्तार होतो. म्हणून आपण वेळेत कृती करणे आवश्यक आहे. असे म्हणत त्यांनी हिंदु समाजाला सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे.
हे केवळ रंगाचे सूत्र नसून आपल्या संस्कृतीचा सन्मान टिकवण्याचा प्रश्न !
मेधा कुलकर्णी यांनी स्वत:च्या सामाजिक माध्यमाच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘काल सदाशिव पेठेतील घटनेने मला पुष्कळ काही सांगितले. आपल्या परिसरात अशा गोष्टींना थारा देणे योग्य नाही. आम्ही यावर ठोस कृती केली आणि भगवा रंग चढवला. हे केवळ रंगाचे सूत्र नाही, तर आपल्या संस्कृतीचा सन्मान टिकवण्याचा प्रश्न आहे.’
संपादकीय भूमिकाहिरवा रंग देऊन तेथे चादर चढवणे, हा लँड जिहादचाच प्रकार आहे. याविषयी सतर्क राहून कृती करणार्या भाजपच्या खासदार प्रा. (डॉ.) सौ. मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन ! लँड जिहाद रोखण्यासाठी हिंदूंनी असेच सतर्क रहाणे आवश्यक ! |